वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित सलग १५ व्या रक्तदान शिबिरास दात्याचा उत्तम प्रतिसाद लाभला असून एकूण ४६ जणांनी रक्तदान केले.

  श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सुशील परब, वैद्यकीय अधिकारी डॉ.लादे, रक्तपेढी सावंतवाडीच्या तंत्रज्ञ उज्ज्वला वाडेकर, परिचारिका मनिषा बागेवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सचिन परुळकर, माजी सभापती यशवंत परब, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलेगेकर, पत्रकार सचिन वराडकर, सिंधू रक्तमित्रचे उपाध्यक्ष महेश राऊळ, वाचनालय अध्यक्ष सगुण माळकर, ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर व शेखर तुळसकर, नाना राऊळ, मंगेश सावंत, दाजी परुळकर, सुजाता पडवळ, सनी रेडकर, निखिल सिध्दये आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान क्षेत्रात विशेष योगदान देणा-या वेंगुर्ला-उभादांडा येथील सनी रेडकर यांचा सरपंच घारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

      शिबीर यशस्वी करण्यासाठी सद्गुरु सावंत, निकिता सावंत, अक्षता गावडे, प्रशांत सावंत, यशवंत राऊळ, रोहन राऊळ, हेमलता राऊळ, सचिन गावडे, प्रविण राऊळ, किरण राऊळ, प्रदीप परुळकर, राजू परुळकर, समर्थ तुळसकर, केशव सावंत, सागर सावंत, बंटी सावंत, नाना सावळ, उदय परुळकर, रोहित गडेकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गुरुदास तिरोडकर, स्वागत उपाध्यक्ष विवेक तिरोडकर तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu