वेंगुर्ल्यातील श्री सातेरीचा जत्रोत्सव फक्त तालुका मर्यादित

कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी वेंगुर्ला येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती व मानकरी मंडळी यांच्या झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला आहे.

      वेंगुर्ल्याची ग्रामदेवता व वेंगुर्ला तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणा-या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) रविवार दि. २९ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न होणार आहे. या जत्रोत्सवासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गोवा, कर्नाटक राज्यातून अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी व आपले नवस फेडण्यासाठी येत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे हा जत्रोत्सव अत्यंत साधेपणाने व तालुका मर्यादित असणार आहे. जत्रा कालावधीमध्ये वेंगुर्ला तालुक्याच्या बाहेरील मिठाई, खाद्यपदार्थ, हॉटेल व खेळण्यांची दुकाने तसेच इतर दुकानदारांना गावात प्रवेश असणार नाही. त्यामुळे कोणीही गर्दी करु नये. मंदिरात येताना भाविकांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टंटसींग आदी नियमांचे पालन करावे असे आवाहन देवस्थान समिती व परब मानकरी यांच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Close Menu