‘एक दाणा‘ या मुकपटाचा शुभारंभ

अन्न फुकट जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या महामारीत याच अन्नासाठी गोरगरीबांना लोकांसमोर हात पसरावे लागले आहे. यात बरेच भूकबळीही गेले आहेत. त्यामुळे समाजाला अन्नाची किमत समजावी आणि अन्न वाया होण्यापासून वाचले पाहिजे यासाठी अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेंन्टमेंटने चित्रित केलेल्या एक दाणाया मराठी लघुपटाचा शुभारंभ ५ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील श्री सातेरी व्यायामशाळा येथे करण्यात आला.

      ‘एक दाणाहा मुकपट असून यामध्ये जान्हवी धुरी व हार्दिक अणसूरकर या बालकलाकारांसह किशोर सोन्सुरकर यांनीही काम केले आहे. विद्या एंटरटेंन्टमेंटचे विद्धेश आईर यांनी निर्मिती केलेल्या या मुकपटाचे दिग्दर्शन मनोहर कावले यांनी केले आहे.

      या मुकपटामध्ये एकिकडे सण-उत्सवामध्ये अन्नाची होणारी नासाडी आणि दुसरीकडे याच अन्नाकडे आशेने पहाणारी मुले यांचे भावस्पर्शी चित्रण समाविष्ट आहे. यावेळी पत्रकार अजित राऊळ, प्रथमेश गुरव, भूषण मसुरकर, किशोर सोन्सुरकर, सौ. अबोली सोन्सुरकर, विद्धेश आईर, अंकीत सोन्सुरकर, संतोष किर, हेमंत चव्हाण, रुपेश मोर्जे, रघुनाथ कुडपकर, पपू चेंदवणकर आदी उपस्थित होते. सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेंन्टमेंटनतर्फे भविष्यात असे जनजागृतीचे उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती किशोर सोन्सुरकर यांनी दिली.

      सदरचा मुकपट हा युट्युबवर एक दाणा मराठी लघुपटhttps://www.youtube.com/watch?v=gB4BCznu428 या नावाने उपलब्ध आहे.

Leave a Reply

Close Menu