होळी सणाला आवास योजनेतील घरांचा ताबा देणार

राज्यात महा आवास अभियानाची अंमलबजावणी जोरदार सुरु असून, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अभियान अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्षा मार्फत महा आवास अभियान-ग्रामीण कोकण विभागाचे संफ अधिकारी संजय घोगळे यांनी नुकताच सिंधुदूर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदूर्गचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जगदीश यादव, अधिक्षक विक्रांत गावडे, सहायक लेखा अधिकारी मनोज पिळणकर, जिल्हा प्रोग्रामर श्रद्धा गिरकर, कनिष्ठ सहाय्यक ऋतुराज तळवणेकर, लिपिक कविता परब, डेटा एन्ट्री ऑपरेटर स्मिता मोजरकर आदी उपस्थित होते.

      या दौ-यामध्ये त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती, वर्दे-कुडाळ, वेंगुर्ला-मातोंड, सावंतवाडी-इन्सुली येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच लाभार्थ्यांच्या घरकुलांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. अभियानातील इतर उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये भर देऊन लाभार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त घरकुलांबरोबरच लाभार्थ्यांचे रहाणीमान उंचावण्यावर भर देण्याच्या सूचना संजय घोगळे यांनी संबंधितांना दिल्या. तसेच श्री. घोगळे यांनी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक दिपाली पाटील यांच्याशी अभियानाच्या सकारात्मक प्रगतीबाबत चर्चा केली.

      सिधुदुर्ग जिल्ह्यात विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील अद्यापपर्यंत ४०७१ घरकुले पूर्ण झाली असून मार्च २०२१ पर्यंत १९९९ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना होळीच्या सणाला घरकुलांचा ताबा देण्याचा मानस असल्याचे संजय घोगळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu