वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयास प्राप्त अँब्युलन्सचे लोकार्पण

वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करुन प्राप्त केलेल्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ला ग्रामीण रुगणालयाच्या ठिकाणी संपन्न झाला.

      सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे वेंगुर्ला सावंतवाडी व मालवण-कट्टा या तीन ठिकाणी नवीन अत्याधुनिक अँब्युलन्स मिळण्यासाठी राज्याच्या शासनाकडे केलेल्या मागणीनुसार तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेसह शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार तिन्ही ठिकाणी शासनाकडून अँब्युलन्स मिळालेल्या आहेत. त्यातील वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयासाठी प्राप्त झालेल्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांच्या हस्ते अँब्युलन्सचे पुजन व श्रीफळ वाढवून तर आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते अँब्युलन्सला पुष्पहार घालून व त्याच्या चाव्या चालकाकडे प्रदान करून झाला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, तालुकाप्रमुख बाळू परब, सचिन वालावलकर, नंदन वेंगुर्लेकर, नगरसेविका सुमन निकम, विवेक आरोलकर यांच्यासह रुग्णालयाचे डॉक्टर्स व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu