भ्याड हल्ल्याचा वेंगुर्ला नगरपरिषदेकडून निषेध

 ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त कल्पिता पिंपळे ह्या मार्केटमधील अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता तेथील एका परप्रांतीय व्यवसायिकाने त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची तीन बोटे छाटली गेली. या घटनेचा वेंगुर्ला न.प. कर्मचा-यांकडूनही जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल तसेच निशा आळवे, अभिषेक नेमाणे, अभिजीत गिरप, विठ्ठल सोकटे, शैलेश सातार्डेकर व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन नगराध्यक्ष दिलीप गिरप, पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना सादर करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu