बौद्ध महासभा वेंगुर्ला तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वेंगुर्ला नूतन कार्यकारणी निवडण्यासाठीची विशेष सर्वसाधारण सभा वेंगुर्ला नगर वाचनालय येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत म्हापणकर यांची निवड करण्यात आली.

     उर्वरित कार्यकारिणीमध्ये रामचंद्र जाधव (सरचिटणीस), अनिल जाधव (कोषाध्यक्ष), सुंदर म्हापणकर (कार्यालयीन सचिव), अशोक सावळे (अंतर्गत हिशोब तपासणीस), जनार्दन परूळेकर (उपाध्यक्ष-संस्कार कल्पित), सागर कोचरेकर (उपाध्यक्ष-प्रचार पर्यटन), लाडू जाधव (उपाध्यक्ष-संरक्षण), सहदेव कदम (सचिव-प्रचार पर्यटन), प्रियदर्शी कदम (सचिव संरक्षण) तर संघटक म्हणून लवू तुळसकर, विलास गवई, संजय वराडकर, सखाराम दाभोलकर यांचा समावेश आहे. 

     यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, संरक्षण जिल्हा उपाध्यक्ष  दिलीप कदमसंस्कार सचिव सुनील जाधव, जिल्हा संघटक पं.ध. माणगावकर, विदिशा जाधव, राकेश वराडकर, रामचंद्र आसोलकर तसेच जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षा सुषमाताई हरकुळकर, जिल्हा प्रचार-पर्यटन उपाध्यक्षा संचिता जाधव, संस्कार सचिव ऋतुजा चेंदवणकर, हिशोब तपासणीस साक्षी खानोलकर, जिल्हा संघटक वैशाली वराडकर, जेष्ठ कार्यकर्ते अनिल जाधव आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu