व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सन १९७४ ते ७६ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी १० संगणक संच महाविद्यालयाला भेट स्वरुपात दिले. मिळालेल्या संगणकांची एक लॅब बनविण्यात आली असून याचे उद्धाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. या संगणक लॅबचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर उपयोग करुन प्राविण्य मिळवावे आणि भविष्यात महाविद्यालयासाठी असा आदर्श समोर ठेऊन योगदान द्यावे असे आवाहनही नगराध्यक्ष गिरप यांनी केले.

    यावेळी बॅचचे अध्यक्ष विजय मोंडकरश्रीनिवास नाईकनिता गोवेकरवासुदेव राऊळउदय परबअरविद सावंतउमाकांत आरावंदेकरअरुण पेठेसुनिला देसाईभाई सावंतदिलीप गावडेसुभाष तोटकेकरश्रीपाद तुळसकरअशोक तोरसकरस्नेहा नाईकसुनिल घाग आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांसोबत सुनिल सौदागर व दिपक सामंत यांचेही सहकार्य संगणक लॅबसाठी लाभले.

    महाविद्यालयाला मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल विजय मोंडकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जीवनात मित्रांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगले मित्र लाभणे हे आपले भाग्य असते मत श्रीनिवास नाईक यांनी मांडले. तर निता गोवेकर यांनी होतकरु विद्यार्थीनीला मदत करण्याचे आश्वासन दिले.

    प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी बॅचच्या दातृत्वाचा विशेष उल्लेख करुन यापुढेही सहकार्य कराचे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.एम.भैरटप्रास्ताविक प्रा.एम.आर.नवत्रेमाजी विद्यार्थ्यांची ओळख प्रा.डॉ.आनंद बांदेकर यांनी तर आभार प्रा.वामन गावडे यांनी मानले.

    या कार्यक्रमावेळी वेंगुर्ल्याचे सुपुत्र डॉ.नंदन सामंत यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Close Menu