दिलीप गिरप यांना सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्काराने सन्मानीत

वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेतर्फे सर्वोकृष्ट नगराध्यक्ष हा राष्ट्रीयस्तरावरील मानाचा पुरस्कार वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना १९ डिसेंबर केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी राज्यमंत्री रविद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

      १९ डिसेंबर झालेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय  सभागृह व शॉपिंग मॉलचे लोकार्पण कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थेचे संजय विलास नार्वेकर व सुषमा संजय नार्वेकर यांनी हा पुरस्कार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना प्रदान केला. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार प्रमोद जठारभाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलीभाजप पदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाणउपनगराध्यक्षा शितल आंगचेकरमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेगटनेते सुहास गवंडळकरप्रकाश डिचोलकरनगरसेवक विधाता सावंतप्रशांत आपटेधर्मराज कांबळीमाजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळसाक्षी पेडणेकरपूनम जाधवस्नेहल खोबरेकरकृपा गिरप-मोंडकरश्रेया मयेकरदादा सोकटे आदी उपस्थित होते.

      जिनीयस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांतर्फे जगातील स्वच्छता सेवांसह सर्व प्रकारच्या शासनाच्या स्वच्छतेचे नियम पाळून जनतेला दिलेल्या सेवांचे सर्वेक्षण करण्यात आले. या संस्थेच्या टीमने सर्वोकृष्ट लोकसेवाकोकण विभागातील कला दालनशुन्य कचरा व्यवस्थापनकचरा डेपोचे सर्वोकृष्ट व्यवस्थापनबहुस्तरीय कचरा विलगीकरणप्लास्टिक बंदीच्या नियमांचे कडेकोट पालनप्लास्टिकचा वापर करून टिकावू रस्ते या कामाची पाहणी केली. ही सर्व कामे त्यांना योग्य वाटल्याने वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थेकडे सादर केलेल्या अहवालानुसार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेचा राष्ट्रीयस्तरावरील सर्वोकृष्टनगराध्यक्ष पुरस्कार जाहीर केला होता. तो रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu