भंडारी महासंघाच्या जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ

गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते वेंगुर्ला-हॉस्पिटल नाका येथील स्वामीप्रसाद कॉम्प्लेक्स येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा भंडारी महासंघाचे सचिव विकास वैद्य, महासंघाचे सदस्य उत्तम मोबारकर वगैरे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व भंडारी बांधवांना एकत्रित करून समाज बांधवांना आरोग्य विषयक सेवा, वधू-वर सूचक मेळावा, तसेच अन्य समाजपयोगी उपक्रम घेण्याचा मानस यावेळी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी व्यक्त केला.

 

Leave a Reply

Close Menu