शून्य कचरा हळदीकुंकू समारंभ संपन्न

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे व प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहरातील बचतगट महिलांचा स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कचरा डेपो) या ठिकाणी शून्य कचरा हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला.

     स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानानिमित्त आयोजित केलेल्या या समारंभावेळी संगीता कुबल यांनी अभियानाची माहिती देत उपस्थित सर्व महिलांना स्वच्छता व पर्यावरण संर्वधनाची शपथ देण्यात आली. वेंगुर्ला येथील सर्व सुजाण नागरिकांनी आपल्याकडे होणारे सर्व कार्यक्रम हे शुन्य कचरा कार्यक्रम संकल्पनेवर आधारित साजरे करावेत, त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन नगरपरिषद करेल असे सांगितले. विलास ठुंबरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu