लाखो रुपयांच्या कामाचे भूमिपूजन

उभादांडा-आडारी रस्ता ग्रामीण मार्गमध्ये पुलाचे बांधकाम या सुमारे ७५ लाखांच्या कामाचे भूमीपूजन ८ फेब्रुवारी रोजी आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

        उभादांडा गावातील आडारी परबवाडा सीमेवर असलेला हा पूल पूर्ण खचून गेला होता. पावसाळ्यात या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने व पूल सखल असल्याने ग्रामस्थ वाहून गेल्याची घटनाही घडली होती. यामुळे दोन्ही भागातील लोकांची हा पूल नवीन होण्याबाबत सातत्याने मागणी होती. दरम्यान आमदार पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नाबार्ड मधून ह्या पुलासाठी ७६ लाख निधीतून हा पूल मंजूर झाला असून याचे आमदार केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

        यावेळी शिवसेनेचे यशवंत परब, सुनील डुबळे, अजित राऊळ, सचिन वालावलकर, निलेश चमणकर, देवेंद्र डिचोलकर, सुकन्या नरसुले, कार्मिस अल्मेडा, सावली आडारकर, टीना अल्मेडा, दया खर्डे, श्री.पडवळ, अण्णा वराडकर, श्री.तेरेखोलकर, यांच्यासह उभादांडा, परबवाडा या दोन्ही गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. ग्रामस्थांच्यावतीने संजय फर्नांडिस यांनी आमदार दीपक केसरकर यांचे शाल श्रीफळ घालून आभार मानले.

Leave a Reply

Close Menu