आरवली येथे २०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात डेरवण येथील पंत वालावलकर रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजार असलेल्या सुमारे २०० रुग्णांची तपासणी करुन त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आली.

      वेंगुर्ला येथील इर्शाद शेख फाऊंडेशन, आरवली विकास मंडळ संचलित आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, वेंगुर्ला तालुका काँग्रेस व डेरवण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली येथे ३ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन आरवली विकास मंडळाच्या ग्रामीण शाखेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर शिवशरण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, आरवली विकास मंडळाचे उपाध्यक्ष गजानन पेडणेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा परब, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत, पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब, प्रकाश डिचोलकर, प्रफुल्ल परब, आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राचे दिलीप साळगावकर, प्रकाश रेगे, सुधाकर राणे, डॉ. प्रसाद साळगावकर, एकनाथ केरकर, जगन्नाथ डोंगरे, बाळू फटनाईक, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, सदस्य स्मिता फर्नांडिस, पांडुरंग फोडनाईक, प्रणय बागकर, काँग्रेस विभागीय अध्यक्ष मयुर आरोलकर, किरण तांडेल, उत्तम चव्हाण, शितल मेस्त्री, पंकज नाईक, दिपक चोपडेकर, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय उफद्र तसेच आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

      शिबिरात सहभागी झालेल्या डेरवण येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.नंदकुमार भोसले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आकाश नारायणी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.सुयश इंगळे, जनरल सर्जन डॉ.दीपक शिदे, नेत्रचिकित्सक डॉ.चिन्मय तोरणे यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्ण तपासणीसोबत त्यांची ई.सी.जी., एक्सरे, रक्त तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली.

Leave a Reply

Close Menu