अनसुचित जाती, जमातीच्या महिला व खुल्या महिलांसाठी दि.१३ जूनला आरक्षण सोडत

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अनुसूचित जाती (महिला)अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोमवार दि. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या श्री छत्रपती महाराज शिवाजी सभागृहात होणार आहे.

      या आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती व सुचना बुधवार दि.१५ जून ते मंगळवार दि. २१ जून दुपारी ३ वाजेपर्यंत वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाच्या आहेत. या कालावधीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. हरकती व सुचना दाखल करणा-या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित रहाण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu