खर्डेकरचा राजविर देसाई जिल्ह्यात दुसरा

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील कु. राजविर विरेंद्र देसाई याने बारावी परीक्षेत सायन्स विभागातून घवघवीत यश संपादन करताना सिधुदुर्ग जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

      कु. राजविर हा बारावी परीक्षेत ९३.१७ टक्क्यांनी उत्तीर्ण होताना वेंगुर्ला तालुक्यात द्वितीयबॅ.खर्डेकर महाविद्यालयात द्वितीय तर संपूर्ण सिधुदुर्ग जिल्ह्यात सायन्य विभागातू द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कु. राजविर हा बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील प्रा.विरेंद्र देसाई यांचा सुपुत्र आहे. या यशानंतर राजविर याचे वडील प्रा.विरेंद्र व आई सौ.अनिता देसाई यांनी पेढा भरवून तर देसाई कुटुंबियांनीही अभिनंदन केले. राजविरच्या या घवघवीत यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu