वेंगुर्ल्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला.संपूर्ण दिवस शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले,त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार झालेल्या पावसामुळे आज सकाळी होडावडा पुलावर पाणी आल्याने एस.टी.सह अन्य वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

      वेंगुर्ला-मठमार्गे सावंतवाडी मार्गावर आकेशियाची झाडे तुटून पडत आहेत. गुरुवारी सायंकाळी आकेशियाची दोन झाडे तुटून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर शुक्रवारी तळवडे-होडावडा पुलावर पाणी आल्याने पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडेतहसिलदार प्रविण लोकरेस्थानिक गुन्हे शाखा ओरोसचे श्री.घागजिल्हा वाहतूक शाखेचे श्री.व्हटकरवेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधवहोडावडा सरपंच अदीती नाईकउपसरपंच अनन्या धावडे यांनी पाहणी करत नदीकिनारी राहणा-या लोकांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या तेथिल परिस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यात १८०.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Close Menu