प्लास्टिक वापरांवर कारवाई सुरू

          शासनाने प्लास्टिक बंदीबाबत नवीन नियमांप्रमाणे कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक वापरावर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणा-यांचा माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे. पहिल्या गुन्ह्यासाठी रू. ५ हजार, दुस-या गुन्ह्यासाठी रू. १० हजार तर तिस-या गुन्ह्यासाठी रू. २५ हजार व ३ महिन्याचा कारावास अशी कारवाई वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सुरू केली आहे.

     सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नियम ४ (२) अन्वये १ जूलैपासून पॉलिस्टीरीन आणि विस्तारित पॉलीस्टीरीनसह खालील सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असेल. तसेच प्लास्टिकच्या कांड्यासह कान कोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंड, कँन्डी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलीस्टीरीन (थर्माकोल), प्लेटस कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे चमचे, चाकू, पिण्यासाठी स्ट्राॅ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकीटाभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किवा पॅक करणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी (१०० मायक्रॉन पेक्षा कमी) या बरोबरच महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसुचना २०१८ अंतर्गत खालील अतिरिक्त एकल वापर प्लास्टिकचा वापर मार्च २०१८ पासून प्रतिबंधित आहेत. सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरीबँग) हँण्डल असलेल्या व नसलेल्या. कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठी पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या नॉन-ओव्हन बँस (पॉलीपोपीलीनपासून बनविलेले), एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन-डीश, बाऊल, कन्टेनर (डबे) (हॉटेल अन्नपदार्थ पॅकेजिंग करिता) यांचेवर कारवाई होऊ शकते.     

     सर्व उत्पादक, साठवणुकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक दुकाने (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र, सिनेमा केंद्र, पर्यटन ठिकाण, शाळा, महाविद्यालय, कार्यालयीन इमारती, रुग्णालय व खाजगी संस्था) तथा सामान्य नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन न.प. व पर्यावरणांस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu