शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारांनी उद्योजक व्हावे-राज्यपाल कोश्‍यारी

विद्यापिठातील लॅबमध्ये जे शेती, अन्न, फळांवर संशोधन केले जाते, त्याचा उपयोग बेरोजगार व शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वत:चे उद्योग सुरु करावेत. जेणेकरुन शेतकरी आणि बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. तसेच या भागातील रोजगारही वाढेल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे प्रशिक्षणाचे उपक्रम यापुढेही राबवावेत असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी वेंगुर्ला येथे केले.

      वेंगुर्लेत सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राच्या भूमिपूजनासाठी आलेल्या राज्यपालांनी येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली. या केंद्रात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या धोरणानुसार जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, महिला, माजी सैनिक, महिला बचतगट, ज्यांना जिल्ह्यातील अन्न आणि विविध फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग करावयाचा आहे अशांसाठी तिन दिवसीय प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया योजने अंतर्गत फळ प्रक्रियेवर आधारित क्षमता बांधणी तथा उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्गवारी दोन सुरु होते. या उद्योजकता प्रशिक्षणास राज्यपाल भगतसिंह कोशारी, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत, कृषि दिवेकर यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी चर्चा केली. या प्रशिक्षणात केंद्राचे डॉ.एम.बी.कदम, उद्यानविद्यावेत्ता तथा प्रशिक्षण समन्वयक प्रा.पी.एम.तल्हा, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ.एम.एस.गवाणकर, डॉ.व्ही.एस.देसाई, डॉ.एम.पी.सणस, प्रा.एल.एस.खापरे, प्रा.एस.पी.साळवी या शास्त्रज्ञांनी फळ, अन्न प्रक्रियेतील नविन उद्योग संधीबाबत प्रात्यक्षिकासह तर तालुका संसधान अधिकारी मयेकर, विनिता दिवेकर, उद्योजकता विकासाबाबत सुनिल देसाई, डी.पी.थोरात यांनी मार्गदर्शन केले.

      शिक्षणमंत्री केसरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन जिल्ह्यात यापुढे असे उपक्रम राबवले जातील आणि या प्रशिक्षणाचा लाभ स्थानिक बेरोजगारांनी घ्यावा असे आवाहन केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी गेडाम, समिर म्हापूस्कार, सिद्धेश पार्सेकर, फिरोज मुल्लाणी, धम्मपाल थोरात यांनी मेहनत घेतली. या क्षमता बांधणी तथा उद्योजकता विकास प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींची माऊली उद्योग, सावंत इंजिनिअरींग वर्क, एक्युरेट इंजिनिअरींग कंपनी, एस.एस.प्लास्टिक कुडाळ येथे औद्योगिक भेट घडवून आणली.

      भविष्यात अशा प्रकारच्या मोफत प्रशिक्षणात यापुढे ज्यांना सहभाग घेऊन स्वत:चा अन्न व फळ प्रक्रीयेवर उद्योग करावयाचा असल्यास त्यांनी वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Close Menu