तपस्वी रा.पां.जोशी यांचा सत्कार

ऋषीपंचमीच्या दिवशी गेली ४७ वर्षांपासून शारदा ज्ञानपीठम्तर्फे विविध क्षेत्रातील तपस्वींचे सत्कार केले जात आहेत. यावर्षी यामध्ये अंगुली मुद्रातज्ज्ञ चंद्रकांत इंगळे, ‘नाभिक वार्तापत्राचे संपादक वामनराव देसाई, मराठी वृत्तपत्रांमध्ये निव्वळ खेळांच्या बातम्यांसाठी स्वतंत्र पान निर्माण करणारे हेमंत जोगदेव, सााप्ताहिक नवप्रमोदचे संपादक व प्रकाशक लक्ष्मीनारायण रहिवाल, श्री सरस्वती एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणारे काकासाहेब जोशी, महाराष्ट्र पोलिस पाटील संघटना स्थापना करुन ३५ हजार पोलिस पाटील संघटित करुन अनेक मागण्यांसाठी यशस्वी आंदोलन करणारे विलासराव पाटील, अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालून शिक्षणाच्या माध्यमातून समाजकारणाचा वसा घेऊन जनसेवेचे व्रत अंगिकारले डॉ.विश्वनाथ कराड, बासरीवादन क्षेत्रातील प्रख्यात पंडित केशव गिडे, आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण करणा-या डॉ.अमृता मराठे यांच्यासह संपूर्ण आयुष्य संस्कृतसाठी वाहिलेले व्रस्तस्थ व्यक्तिमत्व वेंगुर्ला येथील रा.पां.जाोशी यांचा समावेश होता. १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, सिबायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब.मुजूमदार यांच्या उपस्थितीत पुणे हा तपस्वी सत्कार सोहळा संपन्न झाला.

      दरम्यान, रा.पां.जोशी यांची तपस्वींमध्ये निवड झाल्याचे समजताच वेंगुर्ला येथील बाळकृष्ण उर्फ भाई सामंत, दिलीप सामंत, रविद्र सामंत, गुरुनाथ ठाकूर, सुखदा सामंत आदींनी जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.  

Leave a Reply

Close Menu