अनिल सौदागर, मंदाकिनी सामंत पुरस्काराने सन्मानीत

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे बरीच वर्षे अध्यक्षपद भुषविलेले व गेली 30 वर्षे जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारीणीवर काम करीत असलेले, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था संस्थापक असलेले व 12 वर्षे अध्यक्षपद भुषविणारे, सिंधुदुर्ग जिल्हा कंन्झ्युमर डिस्ट्रीक असोसिएशनचे संस्थापक व माजी अध्यक्षपद अशी पदे भुषविलेले, 1972 पासून सुमारे 50 वर्षे व्यापार व्यवसायात कार्यरत असलेले आणि नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेची धुरा सामाजिक काम म्हणून सांभाळणारे अनिल श्रीकृष्ण सौदागर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. तर वेंगुर्ला-भटवाडी येथील नर्मदा कॅश्‍यू फॅक्टरीच्या माध्यमातून सन 1983 पासून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या तसेच सुमारे 50 ते 60 कुटुंबांना जोडण्याचे काम केलेल्या आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजक पुरस्कार पटकाविलेल्या मंदाकिनी दिलीप सामंत यांची श्रीमती माई आरोसकर महिला उद्योजक पुरस्कारासाठी निवड केली होती. या पुरस्कारांचे वितरण 31 जानेवारी रोजी वेंगुर्ला येथे झालेल्या व्यापारी मेळाव्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात सारस्वत बँक संचालक तसेच वेंगुल्याचे सुपुत्र सुनील सौदागर यांनी व्यापारातील धोके, अर्थ नियोजन याबाबत, कॅटचे अध्यक्ष सचिन नवांग गुणे यांनी व्यापारातील डिजिटल आव्हाने आणि विजय केनवडेकर, लघु सूक्ष्म उद्योग राष्ट्रीय समिती सदस्य यांनी व्यापार उद्योगातील योजनांबाबत मार्गदर्शन केले. उद्योजिका अनुजा तेंडोलकर यांनी व्यवसायात येणाऱ्या अडचणी त्यावर केलेली मात याबाबत स्वानुभव सांगत मार्गदर्शन केले.

      यानंतर मेळाव्यात आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार कणकवलीचे दीपक बेलवलकर यांना, कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार माणगाव बाजार व्यापारी संघाचा सन्मान करण्यात आला. कै. उमेश विष्णू शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वेंगुर्ला व्यापारी संघाच्या पंकज शिरसाट याला देऊन सन्मानीत केले. यावेळी ‘अनंत टी’ चहाचे मालक अनंत धडाम, सिद्धिविनायक मंगल कार्यालयाचे दिलीप मालवणकर, भोजनाची उत्तम व्यवस्था करणारे अण्णा जोशी, आनंद पुराणिक, नार्वेकर हॉटेलचे गणेश नार्वेकर, अश्‍विन पांगम, राजन गावडे, कपील पोकळे, आनंद बटा यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर भव्य लकी ड्रॉ चे बक्षीस वितरण करण्यात आले.

      प्रास्ताविक वेंगुर्ला व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी, सूत्रसंचालन नितीन वाळके, काका सावंत, संजय पुनाळेकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu