वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी, अंकिता प्रथम

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित सलग २२ व्या वर्षी शिवजयंती निमित्त घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून श्रावणी आरावंदेकर (दाभोली) तर खुल्या गटातून अंकिता नाईक (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. खुल्या गटातून दहा तर शालेय गटातून सोळा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

     शालेय गट-द्वितीय-अदिती चव्हाण, तृतीय-यशराज नाईक तर उत्तेजनार्थ-वरदा परब (वेंगुर्ला) व नाविन्य डोळस (मालवण) यांनी प्राप्त केला. खुल्या गटातून द्वितीय-प्रसाद खडपकर (नवाबाग), तृतीय-राहुल वाघदरे (सावंतवाडी), उत्तेजनार्थ-करण करंगुटकर (वेंगुर्ला) व श्रुती शेवडे (परबवाडा) यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे बक्षिस वितरण प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सुरेंद्र चव्हाण, माजी अधिक्षक प्रदिप परब, परीक्षक बी.टी.खडपकर, प्रा.शशांक कोंडेकर, अजित राऊळ व प्रा.वामन गावडे यांच्या हस्ते झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई व पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई तसेच प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी विशेष कौतुक केले. या स्पर्धेसाठी सर्व चषक बी.के.कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर आभार संजय पाटील यांनी केले.

Leave a Reply

Close Menu