ग्रामीण भागातील दहावी विद्यार्थ्यांना वाहनाची व्यवस्था

दहावी बोर्डाच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. परिक्षा केंद्रापासून दुर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थांना वेळेत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागते. काहीवेळा एसटीगाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. हे रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी गावागावात वाहनाची व्यवस्था करून त्यांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हायस्कूलचा समावेश आहे. शेवटच्या पेपर पर्यंत ही सेवा दिली जाणार असून आज स्वतः अर्चना घारेंनी परिक्षा केंद्रावर जात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.          

      यावेळी विद्यार्थीपालकशिक्षकराष्ट्रवादीचे योगेश कुबलगोपी बागायतकरकर्मचारी रूपक मातोंडकर आदी उपस्थित होते. याबाबत विद्यार्थ्यांनी अर्चना घारे-परब यांचे आभार मानले.

      दरम्यानसावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात देखील असाच उपक्रम राबविला. सावंतवाडी दाणोली येथील विद्यार्थांना आंबोली परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवीशहराध्यक्ष देवेंद्र टेमकर आदि उपस्थित होते. तिन्ही तालुक्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था अर्चना घारेंनी केली असून या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Close Menu