कर्नाटकातील विजयाचा काँग्रेसतर्फे आनंदोत्सव

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेस प्रचंड बहूमताने विजयी झाल्याबद्दल वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील दाभोलीनाका येथे फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

      यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, कृष्णा आचरेकर, मयूर आरोलकर, कौशिक परब, संकेत वेंगुर्लेकर, साईराज परब, समिर वेंगुर्लेकर, विशाल वेंगुर्लेकर, मयुरेश घाडी, असद मकानदार, साईश परब, स्वदिप परब, प्रल्हाद परब आदी उपस्थित होते. भाजपच्या शिर्ष नेतृत्वाने प्रचारात बजरंगबलीच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न करून बजरंगबलीच्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान केला म्हणूनच बजरंगबलीचा मानाचा दिवस शनिवार यादिवशी बजरंगबलीने आपली गदा आपल्या भक्तांच्या श्रद्धेचा अपमान करणा­यांच्या डोक्यात घातली आणि कर्नाटक विधानसभेत भाजपला भुईसपाट केले. आता महाराष्ट्रात येणा­या निवडणुकांमधून भाजपची अशीच हार होईल आणि महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात पुन्हा येईल असा विश्वास इर्शाद शेख यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Close Menu