‘शासन आपल्यादारी‘ कार्यक्रमावेळी नियोजनाच्या अभावाचा फटका

वेंगुर्ला तहसील कार्यालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत २३ मे रोजी आयोजित केलेल्या ‘‘शासन आपल्या दारी‘‘ महास्वराज्य अभियान शिबीर या कार्यक्रमात वेंगुर्ला तहसील कार्यलयाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिक, दिव्यांग व वृद्धांना सहन करावा लागला. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

    वेंगुर्ला तहसिल कार्यालय व वेंगुर्ला पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालयाच्या सभागृहात शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावागावातून आलेल्या नागरिकांकडून तहसील कार्यालायच्या मुख्य दरवाज्याच्याच बाजूला अर्ज भरून घेतले गेल्याने एकच गर्दी झाली. दिव्यांग व वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

     जे दाखले वितरित करण्यात आले ते दाखले दरवर्षी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत वितरित करण्यात येतात. मग असा कार्यक्रम आयोजित करून भर उन्हातून नागरिक, दिव्यांग, वृद्ध यांना तहसील कार्यालयात बोलवण्यात का आले याचे कारण समजू शकले नाही. या कार्यक्रमाच्या नियोजनाचा फटका सामान्य नागरिकांना मात्र सहन करावा लागला. काही नागरिकांना तर आपल्याला याठिकाणी का बोलावले हेच माहीत नसल्याचे आढळून आले.

Leave a Reply

Close Menu