वेतोरेतील विकासकामांसाठी २ कोटी प्राप्त

वेतोरे गावासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जलजिवन मिशन अंतर्गत १.०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने १ कोटी रुपयांचा निधी साकव-रस्ते -शाळा दुरुस्ती-देवस्थान सुशोभीकरण इत्यादी विकासकामांसाठी दिला आहे.

    दरम्यान, वेतोरे-सबनीसवाडी येथील साकवाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. कित्येक वर्षाची मागणी असलेला, तसेच लोखंडी साकव जिर्ण होऊन मोडकळीस आल्याने वाहतुकही बंद झाली होती. त्यामुळे सबनीसवाडी येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सबनीसवाडी साकव मंजूर करण्याचे अभिवचन ग्रामस्थांना दिले होते व ग्रामस्थांनी सुद्धा भाजपा उमेदवारांना पूर्ण पाठींबा देत संपूर्ण वेतोरे ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात दिली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून सदर साकवाला ५७.६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करुन वचनपूर्ती केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

    यावेळी वेतोरे सरपंच प्राची नाईक, उपसरपंच संतोषी गावडे, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, स्मिता दामले, दीपक नाईक, माजी चेअरमन विजय नाईक, सुधीर गावडे, शैलेश जामदार, नितीन गावडे, विरोचन धुरी, ग्रामपंचायत सदस्य यशश्री नाईक, प्रकाश गावडे, विक्रम सावंत, साक्षी राऊळ, विनायक गावडे, सिता शिरोडकर, तुषार नाईक, सुजाता वालावलकर, माजी सरपंच राधिका गावडे व नेहा गावडे, माजी ग्रा.पं.सदस्य अरुण राऊळ, कोमल नाईक, सविता जाधव, स्वप्नाली सावंत, माजी उपसरपंच राधाकृष्ण वेतोरेकर, अनिल नाईक, ताता गावडे, अरुण राऊळ, प्रभाकर गावडे, जनार्दन गावडे, राहुल सबनीस, बंड्या गावडे, मनिषा धुरी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu