नवाबाग बीचवर स्वच्छता मोहीम

 वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत जी-२० अंतर्गत उभादांडा ग्रामपंचायत हद्दीतील नवाबाग समुद्र किना­यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. नगरपरिषद कर्मचा­यांचा सुट्टीचा दिवस असतानाही या स्वच्छता मोहिमेत सर्व अधिकारी, कर्मचा­यांनी सहभागी होऊन समुद्र किना­यावरील जवळपास ६५० किलो कचरा जमा केला. जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याचा उद्देशाने जगभरातील विविध समुद्र किना­यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

Leave a Reply

Close Menu