वेंगुर्ला आगारातून नविन एसटी बसेस सुरू 

वेंगुर्ला आगारातून मुंबई-परेल, पुणे, तुळजापूर, बेळगांव अशा नविन लांब पल्ल्याच्या एस.टी.बसेस उन्हाळी हंगामासाठी १५ जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत.  यामध्ये वेंगुर्ला आजरामार्गे बेळगांव बस सकाळी ५.१५ वाजता निघेल तर ती बेळगाव-वेंगुर्ला अशी बेळगावातून सकाळी १० वाजता वेंगुर्ल्यासाठी निघेल. वेंगुर्ला-पुणे रातराणी बस सायंकाळी ४ वाजता आजरामार्गे निघणार असून ती पुणे आजरामार्गे वेंगुर्ल्यास परतीसाठी पुणे येथून सायंकाळी ७ वाजता निघेल. आरोंदा-परेल बस वेंगुर्ला आगारातून सायंकाळी ४ वाजता निघणार तर परेल-आरोंदा बस परेल येथून सायंकाळी ४ वाजता सुटणार आहे.

    वेंगुर्ला आजरामार्गे तुळजापूर बस वेंगुर्ला आगारातून पहाटे ५ वाजता सुटणार आाहेत. तर तुळजापूर आजरामार्गे वेंगुर्ला बस तुळजापूर येथून पहाटे ५ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ला बावडामार्गे कोल्हापूर बस वेंगुर्ला आगरातून दुपारी २.३० वाजता सुटणार आहे. तर ही बस कोल्हापूर-फोंडामार्गे वेंगुर्ला अशी कोल्हापूरहून सकाळी ६ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ला-दाभोली-बावडामार्गे पुणे बस वेंगुर्ला आगरातून सकाळी ९ वाजता सुटणार असून ही बस पुणे – फोंडाघाट-मठमार्गे अशी पुणे येथून सकाळी ९ वाजता सुटणार आहे.  या सर्व जादा एसटी फे­यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला आगारातर्फे करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Close Menu