शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिन्या बदलणार

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नळपाणी पुरवठा योजनेसाठी अल्ट्रासोनिक स्वयंचलित वॉटर मीटर पुरवठा करुन कार्यन्वित करणे व वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुधारीत करणेसाठी शहरातील अस्तित्वातील वितरण वाहिन्या बदलणे (पहिला टप्पा) या  कामांचा भूमीपूजन सोहळा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे हस्ते कॅम्प येथे संपन्न झाला.

      वेंगुर्ला नगरपरिषदेला १४७ वर्षाची समृद्ध परंपरा लाभलेली असून नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरावा अशी आणखी दोन कामे शहरात होत आहेत. या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे स्वागत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकरशहर प्रमुख उमेश येरममुख्याधिकारी परितोष कंकाळमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरप,  भाजपा तालुका अध्यक्ष सुहास गवंडकर तसेच प्रशांत आपटेसुनील डुबळेनम्रता कुबलअॅड.श्रद्धा बाविस्करसंतोष परबडॉ. आर. एम.परबगणपत केळुसकरठेकेदार एस.एल.ठाकूर यांच्यासह नगरपरिषदेचेअधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu