माझी वसुंधरा अभियानामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद कोकण विभागात प्रथम ; एक कोटींचे बक्षिस

वेंगुर्ला नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान तिसरे पर्व (२०२३) मध्ये कोकण विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकासहीत १ कोटी रुपयांचे बक्षिस पटकाविले आहे. तर राज्यात दहावा क्रमांक आला आहे. या क्रमांकामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

      १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत हे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले होते. सदर अभियानाचे फिल्ड मुल्यमापन एका कमिटीमार्फत मे २०२३ ला करण्यात आले होते. त्यात पृथ्वीवायूजलअग्नीआकाश आदी निकष लावण्यात आले होते. वेंगुर्ला नगरपरिषदेने भूमी या निकषाखाली केलेली वृक्ष लागवडवायू या निकषागाली केलेले हवेतील प्रदूषणप्रदूषणकारी घटकांचे नियंत्रणजल निकषाखाली जल प्रदूषण टाळणेवेंगुर्ला शहराला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणा-या निशाण तलावातील पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण् व पुर्नजिवनपाण्याचे लेखापरिक्षणअग्नी या निकषाखाली नगरपरिषद इमारतीच्या छतावर सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करणेनगरपरिषद इमारती व सुविधा उर्जा लेखा परिक्षण करुन उर्जा बचतीसाठी प्रयत्न करणेअपारंपारिक उर्जा स्त्रोताचा विकास करणेइलेक्ट्राॅनिक वाहनांसाठी सोईसुविधा निर्माण करणेआकाश निकषाखाली ३ लेस पूर्ततामाझी वसुंधरा जनजागृती व्हावी यासाटी खर्डेकर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस कार्यशाळा घेणेशहरात आढळणारी जैवविविधतेची माहिती दर्शविणारी भित्तिचित्रे व वैज्ञानिक माहितीस्वच्छता उत्सव घेवून त्यात निबंधचित्रकला स्पर्धा घेवून माझी वसुंधरा कार्यक्रमास प्रोत्साहन देणेशहरात पर्यावरण दूत नेमणेहरित क्षेत्रांची निर्मिती व संवर्धन करणे आदी उपक्रम वेंगुर्ला नगरपरिषदेने या अभियानातंर्गत राबविल्याने नगरपरिषदेला ७६०० गुण मिळाले असून ही नगरपरिषद कोकण विभागात प्रथम व राज्यात दहावी आली आहे

      १ कोटी रकमेपैकी ५० टक्के रक्कम हरितक्षेत्र वाढविण्यासाटी व उर्वरित ५० टक्के रक्कम पर्यावरण पूरक व इतर उपाय योजनासाटी वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu