तुळसमधील एकही शाळा शिक्षकाविना राहू नये

  जि.प.च्या शिक्षकांच्या आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमुळे संपूर्ण जिल्ह्यात जि.प.शाळांमधील अनेक पदे रिक्त झाली आहेत, त्याचप्रमाणे तुळस गावातील काही शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त झालेली आहेत. येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असुन सुरूवातीलाच शाळेत शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याबरोबर शाळेत जाण्याविषयी विद्यार्थ्यांच्या तक्रारी येतील व यातूनच विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन तुळस गावातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नसल्याची विशेष दक्षता घेऊन आपल्या स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी तुळस गावातील शिक्षणप्रेमी महिला व पालकांनी सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला पं.स.चे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी सरपंच भाग्यलक्ष्मी घारे, गौरी तुळसकर, भक्ती आरोंदेकर आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Close Menu