आडेली येथे ब्राईट बिगीनिग प्रि स्कूल सुरू

            आडेली येथे ब्राईटबिगीनिंग प्रि स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेचे उद्घाटन शाळेतील मुलांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी आडेतील ग्रामस्थ तुषार कांबळी, स्वप्निल गडेकर, सिद्धेश गडेकर, सचिन गडेकर, भगवान नवार, भालचंद्र परब, संचालिका तथा शिक्षिका भक्ती परब-नवार आदी उपस्थित होते.

      आडेली गावात प्रथमच इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली असून यामध्ये प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी या वर्गांचा समावेश आहे. ३ ते ५ वयोगटातील मुलांसाठी या वर्गामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश प्रकिया सुरू असून १५ जून पासून नियमित वर्ग सुरू करण्यात आले असल्याचे संचालिका भक्ती परब-नवार यांनी सांगितले. तसेच गावातील मुलांना इंग्रजी माध्यमातून पूर्व प्राथामिक शिक्षण घेण्यासाठी  वेंगुर्ला, कुडाळ येथे जावे लागत होते, परंतु गावात ब्राईट बिगीनिंग प्रि स्कूल सुरू झाल्याने पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Close Menu