तुळस येथे ४२ जणांचे रक्तदान

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, श्री सद्गुरुनाथ भजन मंडळ तुळस आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा वेंगुर्ला आयोजित सलग २१ व्या रक्तदान शिबिरात ४२ दात्यांनी रक्तदान केले. पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे रक्तपेढी सावंतवाडीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू आणि पंच अशोक दाभोलकर हस्ते झाले. यावेळी सरपंच रश्मी परब, सदस्य जयवंत तुळसकर, निवृत्त पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस, वैद्यकीय अधिकारी राहुल पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग उपाध्यक्ष महेश राऊळ, सुजाता पडवळ, सुधीर चुडजी, सिद्धेश नाईक, लिस्तर ब्रिटो, राजेश पेडणेकर, श्रीकृष्ण कोंडस्कर आदी उपस्थित होते.

    सद्यस्थितीत युवक समाजात दिशाहीन वावरत असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील तरुण एकत्र येत स्वच्छता, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, व्यावसायिक प्रशिक्षणे अशा समाजहिताचे उपक्रम राबवित आहेत. सामाजिक उपक्रमासह कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमातही योगदान उल्लेखनीय आहे. अशाप्रकारे आजच्या युवा वर्गाला दिशा देणारे आदर्शवत काम करीत असल्याबद्दल अशोक दाभोलकर यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.

     रक्तदानची चळवळ अविरत चालू ठेऊन ख­या अर्थाने समाजाचे देणे देत आहात असा शब्दात दयानंद गवस यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान, श्री सद्गुरूनाथ भजन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर व आभार सचिन गावडे यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu