मुख्यमंत्री ग्रामसडकमधून वेंगुर्ला तालुक्याला कोटींचा निधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. २ मधून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील ६ रस्त्यांच्या कामासाठी ८ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती शिवसनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली. श्री.मांजेरकर यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे ग्रामीण भागांतील महत्त्वाच्या अत्यावश्यक रस्त्यांची कामांचे प्रस्ताव सादर केले होते. स्थानिक नागरिकांनी सुचविलेल्या या कामांचे प्रस्ताव मंजुर होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व त्यांचे सचिव यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. तसेच सदर कामे तातडीने व्हावीत यासाठी पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ही कामे प्राधान्याने मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी हे प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविले होते. त्यानुसार मातोंड-चिरेखण-दळवीवाडी-नाईकवाडी-न्हावेली रस्त्यास १ कोटी ८८ लाख, परूळे कातवण रस्त्यास १ कोटी ४५ लाख, चिपी गाडेघांव कालवण रस्त्यास १ कोटी १८ लाख, प्रजिमा ५६ ते मातोंड-सातवायंगणी १ कोटी ६ लाख, होडावडे स्कूल नं.१ ते राऊळवाडी वजराट रस्त्यास १ कोटी १८ लाख, आडेली धरण भोवरवाडी रस्त्या १ कोटी ४२ लाख अशा ६ रस्त्यांच्या कामासाठी एकूण ८ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्यांची कामे होणार आहेत.

Leave a Reply

Close Menu