अणसूरपाल हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव

  अणसूरपाल विकास मंडळ मुंबई संचलित अणसूरपाल हायस्कूलमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ १७ जून रोजी संपन्न झाला. यावेळी उद्योजक दादासाहेब परुळकर, अणसूर पालक विकास मंडळाचे (मुंबई) अध्यक्ष आत्माराम गावडे, उपाध्यक्ष प्रदिप गावडे, सचिव लिलाधर गावडे, सहसचिव अजित गावडे, सदस्य राजन गावडे, विजय गावडे, अशोक गावडे, धनंजय देऊलकर, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य देवू गावडे, दत्ताराम गावडे, दिपक गावडे, कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शक गजानन गावडे, गोवेकर, कमलेश गावडे, अनिल गडकर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. व्यावसायिक शिक्षणातून स्वतःची उन्नत्ती करा व राष्ट्रविकासाला हातभार असे आवाहन उद्योजक दादासाहेब परुळकर यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभावेळी केले. याच कार्यक्रमात एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यज्ञेश गावडे, मंदार नाईक, भूपेश गावडे, भूमिका राऊळ, साहिल गावडे यांना भेटवस्तू तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे व तेजस मेस्त्री यांचा शाल, श्रीफळ देऊन संस्थेतर्फे करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu