कोकणातील शेतक-यांना श्रीमंत करणार

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर डॉ.संजय भावे यांनी प्रथमच वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांचा संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला.

      शेतक-यांच्या समस्यांवर संशोधन होणे गरजेचे आहे. मला कोकणातील शेतक-यांना श्रीमंत करायचे आहे. शेतकरी समृद्ध होण्याचा मार्ग हा कृषी प्रगतीतूनच येतो असे प्रतिपादन नूतन कुलगुरु डॉ.संजय भावे यांनी केले. यावेळी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक  डॉ.बी.एन.सावंत, शास्त्रज्ञ विचार मंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, उपसरपंच पपू परब, निळेली पशुकेंद्राचे डॉ.ए.पी.चव्हाण, वेंगुर्ला ड्रायव्हर संघटना, भावे यांचे मित्र व वनस्पती रोग शास्त्रज्ञ एम.बी.दळवी, डॉ.बी.एन.सावंत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे अधिक्षक सुनिल नाईक, चंद्रकांत बांदेकर, काजू उद्यानवेत्ता डॉ.राजेंद्र भिगार्डे, कनिष्ठ काजू पैदासकर एल.एस.खापरे, डॉ.ए.वाय.मुंज, वरिष्ठ संशोधन सहाय्यक एस.एस.भुरे, भावे यांची पत्नी स्नेहल भावे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu