जिम्नॅस्टिक्समध्ये ठाकरे संकुलाचे यश

पुणे-बालेवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रसाद सालप (सुवर्ण व रौप्य), देवांश अमुला (सुवर्ण), जीत चव्हाण (सुवर्ण व रौप्य), जश पारीख (३ सुवर्ण व ३ रौप्य), अलिशा चौधरी (सुवर्ण व रौप्य), मुग्धा मोरे (सुवर्ण), टियाना क्रास्टो (सुवर्ण), अवंती भावे (२ रौप्य व १ कांस्य), उर्वी परब (सुवर्ण) या खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली. याती जीत चव्हाण, प्रसाद सालप, जश पारीख,  अवंति भावे, अलिशा चौधरी अणि अनुष्का हे दिल्लीत होणा­या स्कूल नॅशनलमध्ये सहभागी होणार आहे. अरविंद प्रभू, डॉ. मोहन राणे, नीलम बाबरदेसाई, शैलेंद्र लाड, शुभम गिरी, विशाल लोखंडे आणि वंदीता रावल हे सर्व जिम्नॅस्टीना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत.

 

Leave a Reply

Close Menu