सोनचिरैया शहर उपजिविका केंद्राची स्थापना

महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिकरणी शहर स्तर संघ यांच्या माध्यमातून नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये ‘सोनचिरैया शहर उपजिविका केंद्र, वेंगुर्ला‘ची स्थापना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले.

      यावेळी पत्रकार शेखर सामंत, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, समुह संघअक अतुल अडसुळ, हिरकणी शहर स्तर संघाच्या शामल केनवडेकर, स्वाती बेस्ता, सुहानी जाधव, वैभवी पालव, मेघा पडते, सुशिला रेडकर, शिवानी ताम्हणेकर, गितांजली जाधव यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

      महिलांना मुख्य प्रवाहात आणून रोजगार निर्मिती करण्यासाठी भविष्यात महा ई सेवा केंद्र, झेरॉक्स सेंटर, लॅमिनेशन आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी कंकाळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu