तूर्तास दोन दिवस पशुवैद्यकीय अधिकारी देणार

वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने पंचक्रोशितील पशुपालक शेतक-यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. तर गुरांचे प्रतिबंधक लसिकरण होत नसल्याने गुरांना वेगवेगळे आजार होऊन ती दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चव्हाण यांची भेट घेऊन तातडीने वेतोरे येथे पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली.

      यावेळी पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, मठ उपसरपंच बंटी गावडे, वायंगणी उपसरपंच रविद्र धोंड यांच्यासह सुधीर गावडे, विजय बोवलेकर, दिपक करंगुटकर, विष्णू परब, मनवेल फर्नांडीस, निलेश मांजरेकर, आनंद मेस्त्री, सायमन आल्मेडा, दाद तांडेल आदी उपस्थित होते. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक होण्यापूर्वी आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि गुरूवार या दिवशी वेतोरे येथील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर राहतील असे आश्वासन श्री.चव्हाण यांनी दिले.

Leave a Reply

Close Menu