नंदकिशोर गवस स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रित्यर्थ बॅ.खर्डेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिधुरक्तमित्र प्रतिष्ठान, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.

      उद्घाटन प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अॅड.मनिष सातार्डेकर, शाम कौलगेकर, सिधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे लिस्टर ब्रिटो, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढीचे डॉ.अजय शिराळे, निलेश गवस, सुरेंद्र चव्हाण, योगेश गोवेकर, करण निरवडेकर, आनंद कळेकर, रूपेश सावंत, सचिन मांजरेकर, मनिष कळेकर, प्रफुल्ल सावंत, सौरभ धुरी, रामचंद्र सावंत, कौस्तुभ मयेकर, वैभव भोसले, सौरभ भोसले, आस्वाद पोतनिस, भूषण सारंग, प्रशांत गावडे, कौस्तुभ गवस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu