वजराट येथे वनराई बंधारा

तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला व वजराट येथील शेतकरी यांच्यावतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी हर्षा गुंड, कृषी पर्यवेक्षक संदिप देसाई, शंकर नाईक, कृषिसहाय्यक लाडू जाधव, जीवन परब, श्रध्दा वाडेकर, प्रियांका देऊलकर, स्नेहल रगजी, श्रेया चव्हाण तसेच शेतकरी जगदिश भोसले, प्रेमानंद भोसले, विजय भोसले व इतर शेतकरी उपस्थित होते. शेतक-यांनी या बंधा-याच्या पाण्याचा उपयोग रब्बी पिके, भाजीपाला, बागायती पिके, फवारणीसाठी, गुरांसाठी व विहीरीची पाण्याची पातळी वाढण्यासाठी फायदा होत असल्याचे सांगितले. तसेच कृषि विभागाच्या वेळोवेळी होणा-या मार्गदर्शनामुळे आपल्याला विविध योजनांचा फायदा झाल्याचे सांगितले व कृषिविभागाचे आभार मानले.

Leave a Reply

Close Menu