शाळकरी मुलांच्या लंगार नृत्याने मिळविली दाद

उत्कृष्ठ संगीत साथीच्या ठेक्यावर शाळकरी मुलांनी अप्रतिम लंगार नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिकली. यात पोखरण येथील हर्षदा गांवकर व मित्तल सावंत या मुलींनी केलेले बहारदार लंगार नृत्य विशेष दाद देऊन गेले. 

      वेंगुर्ला येथे घेण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलना अंतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दशावतार लंगार नृत्य स्पर्धेत प्रथम – अथर्व ठुंबरे व सदाशिव गावडे (माड्याचीवाडी-नेरूर), द्वितीय-हर्षदा गांवकर व मित्तल सावंत (पोखरण-कणकवली), तृतीय-दिपेश वराडकर व वीर गावडे (उभादांडा), उत्तेजनार्थ – चिरायू मुणगेकर व ऋतुराज खडपकर (कवठी-कुडाळ), नितेश गावडे व रूद्र म्हापणकर, विशाल गावडे व तेजस निवतकर, राम मांजरेकर व साईश पडवळ यांनी क्रमांक पटकाविले. यात फक्त १५ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात आले होते. स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ दशावतारी कलाकार महेश गवंडे व पप्पू नांदोस्कर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu