जिल्हा बँक मसुरे शाखा नविन जागेत

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखा नविन जागेत सुरू केली असून याचे उद्घाटन माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या हस्ते झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे. या बँकेचा सर्वात जास्त फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना होणे आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगून अनेक नवीन योजना बँक चालू करते आहे. यासाठी अध्यक्ष मनिष दळवी यांचे अभिनंदन केले. डिपॉझिट प्रति महिना ५० कोटी येत आहे. येत्या मार्च पर्यंत सहा हजार कोटी व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मनिष दळवी यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu