न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ‘वेताळ करंडक २०२४‘चे मानकरी

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध महोत्सवांतर्गत पूर्व प्राथमिक शाळा व इयत्ता पाचवीपासून पुढील शाळांसाठी विविध स्पर्धा सलग दहाव्या वर्षी संपन्न झाल्या. शाळांसाठी समूहगीत गायन, एकेरी नृत्य, प्रश्नमंजुषा, समूहनृत्य, दशावतार साभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या पाच स्पर्धांमधून अव्वल ठरत मानाचा वेताळ करंडक न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा यांनी पटकावला. तर पूर्व पाथमिक शाळांसाठी आयोजित केलेल्या समूहनृत्य स्पर्धेत एम.एम.परूळेकर प्राथ.शाळा, मालवण यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली.

       शैक्षणिक महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना राज्य संघटक गितेश विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा संघटक बाळा गावडे, माजी पं.स.सभापती यशवंत परब, संदीप पेडणेकर, आबा सावंत, संजय गावडे, अजित राऊळ, नाना राऊळ, प्रतिष्ठानचे  अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव डॉ. सचिन परुळकर आदी उपस्थित होते. शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना ख­या अर्थाने व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे याबद्दल समाधान व्यक्त करून गितेश राऊत यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदीप परूळकर यांनी २६ वेळा रक्तदान आणि खजिनदार माधव तुळसकर यांनी २९ वेळा रक्तदान केल्याबद्दल तर पहिल्या अधिकृत रिक्षाचालक हेमलता राऊळ व रक्तमित्र संघटक म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे सर्पमित्र महेश राऊळ आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर यांचाही सन्मान करण्यात आला.

    स्पर्धेतील प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे – प्रशाला समूहगीत गायन स्पर्धा – परशुराम मास्तर हायस्कूल-तेंडोली, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च विद्यालय-नेमळे, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, प्रशाला समूहनृत्य स्पर्धा- श्री शिवाजी हायस्कूल-तुळस, न्यू इंग्लिश स्कूल-उभादांडा, परबवाडा शाळा नं.१, प्रशाला प्रश्न मंजुषा स्पर्धा- श्री शिवाजी हायस्कूल-तुळस, नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय-नेमळे, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, प्रशाला – दशावतार साभिनय स्पर्धा-वीर गावडे, ओमप्रकाश नाईक, प्रशाळा एकेरी नृत्य स्पर्धा – वैष्णवी मुणनकर (केळूस), दिशम परब (वेताळ  विद्यामंदिर तुळस), काव्या गावडे (मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी), पूर्व प्राथमिक शाळा-समूहनृत्य स्पर्धा- एम.एम.परूळेकर प्राथमिक शाळा-मालवण, वेताळ विद्यामंदिर-तुळस, जिल्हा परिषद शाळा मातोंड-गावठण. विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करून गौरविण्यात आले.

       समूहगीत गायन स्पर्धेचे परिक्षण वैभव परब आणि मनिष तांबोसकर यांनी तर इतर सर्व स्पर्धांचे परिक्षण नृत्यांगना मृणाल सावंत आणि गीताली मातोंडकर यांनी केले. सूत्रसंचालन बी.टी.खडपकर यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu