कातकरी कुटुंबांनी घेतला आदिवासी न्याय महाभियानाचा लाभ

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत वेंगुर्ल्यातील कातकरी समाजाच्या विविध स्वरूपाच्या शासकीय कागदपत्रे व शासनाच्या योजनांच्या लाभासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ३० कातकरी समाज बांधवांनी लाभ घेतला.

       तहसीलदार कार्यालयात शासनांतर्गत घेतलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन कातकरी समाजातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते झाले.  यावेळी आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक गणेश मेटे, उदय आईर, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी लक्ष्मण गावडे, मिनल रेडकर, पुरवठा विभागाचे अधिकारी गणेश पाटील, मंडळ निरीक्षक बी.सी.चव्हाण, निवडणूक शाखा अधिकारी अनुराधा परब, पुरवठा विभागाचे सहाय्यक सचिन सागर, तलाठी ज्ञानेश्वर गवते, उभादांडा तलाठी श्री.रामोड, पोलीस पाटील विजय नार्वेकर, संजय गांधी विभागाच्या ऑपरेटर प्राजक्ता देसाई, वेंगुर्ला सेतू सेवा केंद्राचे चालक संजय कोंडसकर, महा-ई सेवा केंद्र, उभादांडाचे संचालक उदय चजराटकर, न.प.चे स्वप्नील कोरगांवकर आदी उपस्थित होते.

    या विशेष अभियानाच्या कार्यक्रमांत वेंगुर्ला शहरात निमुसगा, कॅम्प येथे वस्ती असलेल्या कातकरी समाजाच्या कुटुंबातील व्यक्तींची नसलेली रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र नोंदणी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेसाठी अत्यावश्यक असणारी कागदपत्रे, तसेच शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेसाठी लागणारी तसेच नवीन गॅस कनेक्शनसाठी लागणारी कागदपत्रे याबाबत आदीवासी विकास विभागाचे निरीक्षक गणेश मेटे यांनी सर्व कातकरी कुटुंबातील व्यक्तींना मार्गदर्शन केले. तसेच उदय आईर यांनीही मार्गदर्शन केले.  

    यावेळी सुमारे ३० कातकरी कुटुंबातील छोट्या लहान मुलांसह त्यांचा परिवार उपस्थित होता. छोट्या मुलांची नवीन आधारकार्ड-५ व आधारकार्ड अपडेट-११ करण्याचे काम महाई सेवा केंद्र, उभादांडाचे संचालक उदय वजराटकर व त्यांचे मदतनीस यांनी केले. 

Leave a Reply

Close Menu