विशाल परब यांच्यामार्फत गरजूंना आर्थिक मदत

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी रेडी येथील विविध गरजू व्यक्तिना ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यात वेदिका विनायक शेटकर यांना घर दुरुस्तीसाठी १० हजार, मानसी सगुण सातोस्कर यांना घर दुरुस्तीसाठी १५ हजारआर्या संजय राऊत हिला पदवीधर शिक्षणासाठी ५ हजार अशी एकूण ३० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही मदत रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते वितरित केली. यावेळी उपसरपंच नमिता नागोळकर, ग्रा.पं. सदस्य आनंद भिसे, श्रीकांत राऊळ, सागर रेडकर, ग्रामस्थ उल्हास नरसुले, अमरेंद्र राणे, कर्मचारी सगुण सातोसकर आदी उपस्थित होते. या मदतीसाठी विशाल परब यांचे रेडी ग्रा.पं.कडून आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu