आनंदयात्रीच्या ‘श्रावणधारा‘ लघू काव्य संग्रहाचे प्रकाशन

सातत्याने साहित्य विषयक उपक्रम घेणा-या वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाचा स्नेहमेळावा साई दरबार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यात मागील श्रावण महिन्यात आनंदयात्रीतील कवींनी श्रावणातील पावसावर व निसर्गावर केलेल्या विविध कवितांचे संकलन करून आनंदयात्रीच्या श्रावणधारा‘ या लघु काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. पांडुरंग कौलापुरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थित कविनी विविध कवितांचे वाचन केले. 

      यावेळी आनंदयात्रीच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळीडॉ.संजीव लिंगवतसातेरी प्रासादिक संघाचे अध्यक्ष राजाराम नाईककथाकार प्रदीप केळुसकर आदी उपस्थित होते. स्नेहमेळाव्यात झालेल्या अनौपचारिक चर्चेत अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. साहित्यिकांच्या स्मारकाना भेटी देणेकथाकथन सत्र व कथा अभिवाचन सत्र घेणेकथालेखन व ललित लेखनाची दिशा मिळावी म्हणून तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणेसाहित्यातील यशस्वी लोकांच्या मुलाखतीचर्चासत्रे ठेवणे असे विविध उपक्रम घेण्याचे ठरले.

      महाराष्ट्र शासनाच्या शालेय शैक्षणिक सुकाणू समितीवर निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.आनंद बांदेकरपीएचडी मिळवल्याबद्दल प्रा.डॉ.सचिन परूळकरएम.ए.एज्यूकेशनची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल शैलजा परूळकर यांचा तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाऊन पारितोषिके पटकावणा-या भेरा‘ या मालवणी चित्रपटाचे लेखक व अभिनेते प्रसाद खानोलकर यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu