सिधुदुर्गला मराठी माध्यमासाठी ६१५ शिक्षक

जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीत स्थान मिळालेल्या डीएड उमेदवारांच्या चेह­यावर हास्य पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची तपस्या फळास आली. शिक्षक म्हणून नोकरी करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असताना भरती लांबल्याने त्यांना खूप काही सोसावे लागले. कुठेतरी खासगी नोकरी वा क्लास चालवून त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पण यादी जाहीर नंतर त्यापैकी काहींना दिलासा मिळाला आहे.

    जिल्हा परिषद सिंधुदुर्गला मराठी माध्यमासाठी एकूण ६१५ शिक्षक मिळाले आहेत. निवड यादीवरील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. २०२४ च्या होऊ घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीची जर आचारसंहिता लागली नाही तर लगेचच या महिन्यापासूनच नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तसेच ज्या उमेदवारांना स्वयंसेवक शिक्षक तत्वावर शाळेत कंत्राटी पद्धतीने भरती केले होते, त्या शिक्षकांना जिल्हा परिषदच्या नवीन शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत पदावर कायम ठेवण्यात येणार, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रदीफमार कुडाळकर यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu