कासव म्युझियमसाठी ५० लाखांचा निधी देणार – दीपक केसरकर

महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत वायंगणी बीच येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी कासव महोत्सव वायंगणी २०२४संपन्न झाला. कासवांच्या प्रजननाचा भाग म्हणून वायंगणी बीचची ख्याती दूरवर पसरली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक कासवांना व त्यांच्या पिल्लांना पाहण्यासाठी येतात. त्यामुळे पर्यटनदृष्ट्या स्थानिकांचा विकास साधण्यासाठी या भागात कासव म्युझियम होण्यासाठी सिधुरत्न योजनेतून ५० लाख रूपयांचा निधी देणार आहोत अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.

    यावेळी सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच रविद्र धोंड, सावंतवाडी उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी, सहाय्यक वन संरक्षक डॉ.सुनिल लाड, कुडाळ वन अधिकारी संदिप कुंभार, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, कडावल वनक्षेत्रपाल अमिट कटके, प्रांताधिकारी हेमंत निकम, सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, अप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, मठ वनपाल सावळा कांबळे, वनरक्षक सूर्यकांत सावंत, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदिप भोसले, नितीन मांजरेकर, सुनिल डुबळे आदी उपस्थित होते.

    याच कार्यक्रमात कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणा­या सुहास तोरस्कर, प्रकाश साळगांवकर या कासवमित्रांचे प्रमाणपत्र देऊन श्री.केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या दोन्ही कासवमित्रांना प्रत्येकी १० हजार रूपये तर कासव संवर्धनाचे काम उत्कृष्टपणे करणा­या वायंगणी ग्रामपंचायतीस कासव संवर्धनास प्रोत्साहानपर २५ हजार रूपये बक्षिस स्वरूपात जाहीर केले. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलेले कासवाचे वाळूशिल्प पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरले.

   महोत्सवात समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडणे, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे स्थानिक लोकसहभागातून कासव संवर्धनावर मार्गदर्शन, कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफित, मानद वन्यजीव रक्षक नागेश दफ्तरदार यांचे कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, परिसंवाद व क्षेत्रभेट, ‘कुर्म अवतारपौराणिक दशावतार नाटक, वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम, कांदळवन सफारी, कांदळवन संवर्धन मार्गदर्शन, किल्ले निवती भ्रमंती असे कार्यक्रम संपन्न झाले.

 

Leave a Reply

Close Menu