पल्स पोलिओ मोहिमेतील सहभागींना नाश्ता व भोजनाची सोय

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहभागी झालेल्या डॉक्टरअधिकारी व कर्मचारी यांना डॉ.राखी माधव आणि मित्रमंडळातर्फे नाश्ता तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या माध्यमातून सर्वांना भोजन देण्यात आले.

      नुकतीच पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. यासाठी २३ बुथ व २ मोबाईल टीमची नियुक्ती केली हती. दरम्यानतुळस प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा-या तुळसहोडावडामातोंडआसोलीपालउभादांडापरबवाडा येथील बुथवरील डॉक्टरअधिकारी व कर्मचारी यांना डॉ.राखी माधव आणि मित्रमंडळातर्फे नाश्ता तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व सचिन वालावलकर यांच्या माध्यमातून सर्वांना भोजन देण्यात आले. हे भोजन सचिन वालावलकर यांनी संबंधितांकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ.दत्तप्रसाद पवारडॉ.सई लिगवत यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu