महाविद्यालयीन स्पर्धेत डांटस लॉ कॉलेजचे यश

कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के.सी.लॉ कॉलेज मुंबई आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमधील मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंटकाऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस या प्रकारात सहभाग घेतला होता. त्यापैकी राष्ट्रीय मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस यात अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले. तर मिडिएशन प्रकारात सहिष्णू पंडित एडवर्ड पिंटो आणि प्रतीक सावंत यांनी चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावून दिले. तसेच लेटर टू चीफ जस्टीस यात यशोधन सावंत व संजय झांटये यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख व न्यायाधीश मर्णे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यशस्वी स्पर्धकांचे व्हिक्टर डांटस, प्राचार्या शिल्पा मर्गज, प्राध्यापक व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Close Menu